Breaking News

Tag Archives: worker

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना मिळणार “या” कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना कायदेशीर पाठबळ ही मिळणार

चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान… महाराष्ट्राचे नुकसान होतेय हे अतिशय दुर्दैवी

गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

कामगारांच्या कल्याणसाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांमध्ये चर्चा

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून खाडे यांना उत्तर प्रदेश …

Read More »

अजित पवार म्हणाले, ती लोक जशी कष्टाची कामे करतात तशी आपल्याकडची नाहीत पुण्यातील येरवडा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अजित पवारांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसापूर्वी येरवडा येथील शास्त्रीनगर भागात इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील माणसे जशी कष्टाची कामे करतात तशी कामे आपल्याकडची करायला तयार होत नाहीत …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा दावा

मुंबईः प्रतिनिधी कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक-शेतमजुर यांनी संप केला. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग , वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, …

Read More »

जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More »

मूळ गावी गेलेला तो परत येतोय, राज्यात…पण क्वारंटाईन होवून सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद, थर्मल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता …

Read More »

उत्पादकतेला आरोग्याची जोड द्यावी लागणार कोरोनासोबत जगण्यासाठी पोटाला भाकर आणि हाताला काम द्यावे लागेल

चीनमध्ये डिसेंबर १९ ला मध्ये आढळून आलेल्या covid-19 विषाणूचा फैलाव भारतात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च २४ ला लॉकडाउन सुरू झाला. १३० कोटीचा देश स्तब्ध झाला. यामुळे मोठ्या जनसंख्येचे उत्पन्न बुडाले, बचत संपायला लागली, रोजगार बुडाला. साहजिकच साथ येण्यापूर्वी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था पूर्ण बुडण्याच्या मार्गावर आहे. धोरणकर्ते लॉकडाउनमध्ये काय करावे …

Read More »

दुसऱ्याच्या घरबांधणीसाठी राबणाऱ्यालाही मिळणार हक्काचे घर ५० हजार घरे बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांकडून दुसऱ्यांच्या घराच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असतात. त्या बदल्यात त्यांना वेतनही मिळते. मात्र ते अत्यंत तुटपुज्या स्वरूपात मिळत असल्याने आणि त्यांच्या कामाची कोणतीही शाश्वती नसल्याने अशा बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरांसाठी उन्हातान्हात काम करणाऱ्यांच्या …

Read More »