Breaking News

मुंबई शिधावाटप सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश जाधव तर सचिवपदी संतोष शिंदे

१२ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मुंबई शिधावाटप कर्मचारी क्रेडिट को ऑप सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व ११ च्या ११ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत एकूण २४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांपैकी संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश जाधव व सचिवपदी संतोष शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमन म्हणून चैतन्य वानखडे व खजिदारपदी तुषार रेडीज यांची निवड करण्यात आली, तर संचालक पदी सुधीर फडोळ, बाळकृष्ण उदुगडे, महेश देशपांडे, सचिन झेले, राजीव भेले, स्वाती आचरेकर व स्मृती सुर्वे यांची व तज्ञ सल्रागारपदी प्रकाश कदम यांची निवड करण्यात आली. मतदारांनी एकहाती विजय मिळवून दिल्याबद्ल संस्थेचे चेअरमन प्रकाश जाधव व सचिव संतोष शिंदे यानी मतदारांचे आभार मानून संस्थेकडून कायम सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे मत व्यक्त केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये

विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *