Breaking News

मुंबई

संजय राऊत यांना धमकी, सिध्दू मुसेवाला प्रमाणे… एके ४७ ने हत्या करण्याची दिली धमकी

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका गुंडामार्फत हल्ला करण्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून दिली होती. त्यानंतर काल शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारात संजय राऊत यांना एसएमएसवरून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून दिल्लीत एके-४७ ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत सरकार सकारात्मक

श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व …

Read More »

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या मध्य रेल्वेकडून कोकण, दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटे आरक्षित करण्यासाठी झुंबड उडते. मात्र अनेकांना आरक्षित तिकिटे मिळाली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करत एकतर प्रवास करावा लागतो किंवा खाजगी वाहनाने अवाच्यासव्वा दराने प्रवास करावा लागतो. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे यासाठी सुट्टीचा आनंद घेता …

Read More »

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची माहिती, परिसंस्था – आधारित दृष्टीकोन यावर केंद्राचा भर जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाची बैठक

मुंबईत जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्रारंभिक बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण …

Read More »

मनसेप्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे यांच्यात एकतास चर्चा, बैठकीनंतर निवडणूकीसाठी… खटले मागे घेण्याबाबतचा निर्णय तपासून घेण्यात येईल -मुख्यमंत्री

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांची मालेगावात अनेक वर्षांनी ही सभा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. या दरम्यान मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे …

Read More »

कॅग अहवालावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून चौकशी… भाजपा आमदार अमित साटम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांचे उत्तर

मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही. तसंच निविदा न काढताच कामं देण्यात आली असे मुद्दे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. आमदार अमित साटम यांनी कॅगच्या अहवालातले मुद्दे वाचून दाखवण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यानंतर अध्यक्षांच्या संमतीने देवेंद्र फडणवीस यांनी अहवालातल्या मुद्द्यांचं वाचन केलं. त्यानंतर पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

गायकवाडांनी हिंडेनबर्गचा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटी-शर्थींच्या पूर्ततेशिवाय सहमती नाही कोणत्याही परिस्थितीत धारावीचा पुनर्विकास होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

धारावीतील पुनर्विकास प्रकल्प अदानीला बहाल करण्यात आली असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संशोधन समितीचा अहवाल बाहेर आला. या अहवाालावरून सध्या संसदेत आणि उद्योग जगतात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. या सर्व चर्चेचा संदर्भ देत धारावीच्या काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यावर …

Read More »

छत्रपतींच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात जाणता राजा महानाट्याला हजेरी लावल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण

शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज भावना व्यक्त केल्या. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून पहिल्या प्रयोगा पासूनच …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची घोषणा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती विधानसभेत केली घोषणा

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये शासनाला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, कुर्ल्यातील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात उद्योग व कामगार वाचवा व भ्रष्ट बीएमसी अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करा

कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक …

Read More »