Breaking News

मुंबई

इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांची माहिती

इर्शाळवाडी ता. खालापूर जि. रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी केले. विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी आज …

Read More »

अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …

Read More »

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतरीत पुनर्वसन इर्शाळवाडी घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारले तर या व्हॉट्सॲपवर नंबरवर करा तक्रार पहिवहन विभागाकडून व्हॉट्स अॅप नंबर जारी

शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, इर्शाळवाडीची दुर्घटना झाल्याने वाढदिवस साजरा करू नका मात्र ट्विटरवरून ताज हॉटेल येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा कऱण्याचे निमंत्रण

गतवर्षीच्या रायगड जिल्ह्यातील माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना इर्शाळवाडी येथे आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या ठाकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या दरड खाली अनेक घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवातहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू मुख्यमंत्री घटनास्थळावर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, इर्शाळवाडी दुर्घटनेची सविस्तर माहिती ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडीवर रात्री झोपेत असलेल्या आदिवासांच्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला. गतवर्षी रायगड जिल्ह्यातीलच माळीण येथे अशीच दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसानंतर गावात दरड कोसळल्याची ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या …

Read More »