Breaking News

मुंबई

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबदल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- महिला मुंबई अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर

मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत असतात. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या आशा वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर यांच्याकडून निषेध करत आंदोलन केले आहे. तसेच संभाजी भिडे यांना तत्काळ राज्य सरकारने अटक …

Read More »

पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२३-२४ साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. …

Read More »

जयपूर-मुंबई एस्क्सप्रेसमध्ये गोळीबारः आरपीएफ उपनिरिक्षकासह ४ जणांचा मृत्यू पोलिस आयुक्त शिसवे म्हणाले, वेगवेगळी वक्तव्ये एकत्र करून अंतिम असेल ते सांगू

जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या १२९५६ जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात आज ३१ जुलै सकाळी गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत आरपीएफच्या उपनिरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी …

Read More »

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ….त्यांची सवय आहे काहीही बोलण्याची… संजय सिरसाट यांच्यावर प्रियंका चतुर्वेदी अखेर बोलल्या

राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे दावे-प्रतिदाव्यांच्या राजकारणात दोन्ही बाजू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी संध्याकाळी बोलताना प्रियांका चतुर्वेदी व आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय …

Read More »

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्ते दोन वर्षाच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटकरण करण्याच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, ठाणे – नाशिक महामार्ग आठ पदरी…. मुख्यमंत्र्यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी

ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील …

Read More »

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आता मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली शपथ

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी २९ जुलै झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई …

Read More »

उद्धव ठाकरे खोचक टीका, भाजपा आणि मिंदे गटाला सध्या एकच प्रश्न पडलाय…. २००७ साली अशीच परिस्थिती होती पण आपण केलेल्या मेहनतीवर पुन्हा विजय मिळविला

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सायन येथील काही कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा आणि मिंदे गटाने रोज माझ्याकडील निष्क्रीय शिवसैनिकाला प्रत्येक आठवड्याला फोडून …

Read More »

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे निधन ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे आज दुपारी के ई एम इस्पितळात निधन झाले. अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परीवार असून उद्या शनिवारी सकाळी १० वाजता दादर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक …

Read More »