Breaking News

मुंबई

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची घोषणा

मीरा भाईंदर येथील जनतानगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (बीएसयूपी) मोफत सदनिका देण्यात आल्या होत्या. यात काही लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून त्या सदनिका ताब्यात घेतली जातील आणि याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश सर्व शासकिय कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना लवकर सोडले

मुंबईसह राज्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन …

Read More »

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा: वेळेत पोहोचा… परिक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन

सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला टोला

विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वासाचा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार पहाटे काम करतात तर फडणवीस ऑल राऊंडर आणि मी…. विरोधी पक्ष आहे कुठे?

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या बोली भाषेतून चौकार षटकार लगावले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भर पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये हशा पिकला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार, …

Read More »

पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार मांडणार ही १४ विधेयके आणि ६ अध्यादेश शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात महत्वाची विधेयके

राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदार सहभागी झाले. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारची ताकद विधिमंडळात चांगलीच वाढली आहे. तसेच या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन होत असून या अधिवेशनात १४ विधेयके विधिमंडळाच्या सभागृहात मांडण्यात येणार आहेत. या विधेयकामध्ये …

Read More »

अजित पवार यांचा फुटीर गट अचानक शरद पवार यांच्या भेटीला, आर्जव करत म्हणाला… भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संकल्पनेतून आणि शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर महाविकास आघाडीने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. त्यास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ९ आमदारांनी बंड पुकारत राज्यातील भाजपा-प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत …

Read More »

मुंबईत सरकत्या जिन्यासह असलेल्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज (दिनांक १५ जुलै २०२३) करण्यात आले. मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे उद्गार यावेळी …

Read More »

वैचारिक मूल्यांशी बांधिलकीचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता आणि …

Read More »