Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!

मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज …

Read More »

‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बस विषयी माहिती …

Read More »

…. आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्ट फोन

आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून स्मार्ट फोन मिळाला. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि …

Read More »

राज्यपाल बैस म्हणाले, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र…

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल,… मोदींचे राज्य की औरंगजेबाचे

मागील काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगवास भोगल्यानंतर आता ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आणि संजय राऊत यांच्या मुलीला ईडीने नोटीस पाठविली. या ईडी नोटीसीवरून संजय राऊत यांनी ईडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनप्रकरणी सरकारला निर्देश

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईकडे मार्गक्रमण सुरु केले. मराठा समाजाचा आरक्षण मोर्चा २६ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत पोहोचणार असून त्या …

Read More »

रोहित पवार यांची ईडीकडून अद्यापही चौकशी सुरुच, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने धाडसत्र राबविले. त्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचानालयाकडून आज चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार कर्जत जामखेडचे आमदार तथा शरद पवार …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखापेक्षा जास्त खेळाडू सज्ज

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन …

Read More »

मुंबई पोलिसांची १२,८९९ पदे रिक्त

मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याचे उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि …

Read More »

टाटा मुंबई हाफ मॅराथॉन मध्ये भारतीय सैन्यातील तिघेः तर व्हर्च्युअल रन वैशिष्ट

आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पहिल्यांदाच मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी व्हर्च्युअल रनच्या माध्यमातून इच्छुक धावपटू त्यांच्या स्थानिक शहरात धावले. दरम्यान, मुंबईकरांसाठी आयोजित केलेल्या या हाफ मॅराथॉन स्पर्धेत पुरूष आणि महिलांची …

Read More »