Breaking News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शोग्लिट्झ नवरात्री उत्सव २०१९ २ ओक्टोबर रोजीचे उत्पन्न मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

मुंबई: प्रतिनिधी
या नवरात्रीत, अल्हाददायक संगीतावर थिरकण्यासाठी तयार रहा! पूरग्रस्तांना मदत म्हणून निधी उभारण्यासाठी बोरीवलीत फाल्गुनी पाठक आपल्या सुमधूर संगीताने मंत्रमुग्ध करणार आहेत. या शोग्लिट्झ नवरात्री उत्सव २०१९ ची घोषणा शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी भूमी पूजनाच्या वेळी करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या दुर्दैवी पूरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, त्यांना सहाय्य करण्यासाठी शोग्लिट्झ नवरात्री उत्सव २०१९ च्या आयोजकांनी ह्या भव्य कार्यक्रमाची एका दिवसाची कमाई महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचे ठरवले. हा निधी विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
या भव्य कार्यक्रमाची घोषणा भूमी पूजनाच्या वेळी शनिवारी करण्यात आली आहे. फाल्गुनी पाठक आणि ता-थैया ह्यांच्या सोबत शोग्लिट्झ एव्हेंट्स ऍण्ड एंटरटेनमेंटने या नवरात्री उत्सवाचे आयोजन केल्यामुळे रसिकांचा उत्साह द्विगुणित होणार आहे, आणि ह्या ९ दिवसात रसिक सुमधूर संगीतावर मनसोक्त थिरकणार आहेत. भूमिपूजनाच्या दिवशी पूरग्रस्तांसाठी ११,००,००० रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. त्याचबरोबर आयोजकांकडून २ ऑक्टोबर रोजी अर्थात गांधी जयंतीच्या दिवशी मिळालेली सर्व उत्पन्न मुख्यमंत्री मदत निधीला देण्यात येणार आहे.
पारंपारिकरित्या या नवरात्री उत्सवाची सुरुवात शनिवारी भूमी पूजनाने झाली. या भूमी पूजनाच्या प्रसंगी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, विनोद तावडे (उच्च व तंत्रशिक्षणमंत्री) आणि योगेश सागर (नगरविकास राज्यमंत्री) आमदार मनीषा चौधरी, विजय भाई गिरकर, विलास पोतनीस आणि अस्लम शेख आदी उपस्थित होते.
शोग्लिट्झ इव्हेंट ऍण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे आयोजक संतोष सिंग आणि शिवा शेट्टी म्हणाले की “बोरीवलीमध्ये या वर्षीचा उत्सव साकार करण्यात गोपाळ शेट्टी, विनोद तावडे, आशिष शेलार आणि योगेश सागर ह्यांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.”
फागुनी पाठक सलग चौथ्या वर्षी बोरीवलीत…
बोरीवली येथील प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे फागुनी पाठक सलग चौथ्या वर्षी नवरात्री उत्सवात आपल्या संगीता़ची जादू दाखवणार आहे्त. मुंबईतील नवरात्री उत्सावाची धम्माल आणि उत्साह म्हणजेच फाल्गुनी पाठक असे समीकरण झाले आहे. खरं सांगायचं तर त्यांच्या वेड लावणार्‍या झांझरिया या गाण्यापासून अजरामर इंधिना विन्वासारख्या लोकांची पावलं आपोआप थिरकायला लावणार्‍या गीतांशिवाय गरबा रात्रीची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही. म्हणूनच नवरात्र उत्सव २०१९ च्या आयोजकांनी या भव्य कार्यक्रमासाठी फाल्गुनी पाठक ह्यांना पसंती दर्शवली आहे.

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *