Breaking News

परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल ८ पैकी २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक बाकिच्यांनाही लवकरच अटक

मुंबई: प्रतिनिधी

१०० कोटी रूपये खंडणी वसुलीप्रकरणी आरोप करून चर्चेत आलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुली आणि मालमत्ता अपहारप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्यासह आठजणांहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने परमबीर सिंग यांना केव्हाही अटक होवू शकते अशी चर्चा पोलिस दलात सुरु झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील रहिवासी श्यामसुंदर अग्रवाल यांनी यासंदर्भात गुन्हा नोंदविला असून याप्रकरणी संजय पूनामिया, सुनील मांगीलाल जैन, परमबिर सिंह, अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, आशा कोकरे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील व इतर सहकारी साथीदार या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांवर संगंनमत करून, खोटे दस्तऐवज तयार करून ,कायद्याचा धाक दाखवून फिर्यादी कडून खंडणी स्वीकारली ,तसेच फिर्यादीच्या मालमत्तेचा अपहार केला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्वांच्या विरोधात C.R.NO.299/2021, कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 468, 471, 120 (B ), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 IPC आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मरीन लाईन्स पोलिसांनी संजय पूनामिया. सुनिल मांगीलाल जैन यांना तात्काळ अटक करून किल्ला कोर्टात हजर करण्यात आले असून या दोघांना रिमांड मिळालेला आहे. गुन्हा नोंदविण्यात आलेल्या या सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत खंडणी वसुल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ही तक्रार काल रात्री उशीराने दाखल करण्यात आली आहे.  आतापर्यत परमबीर सिंग यांच्या विरोधात ३ रा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ही ३ रा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून सर्व पोलिस अधिकारीच आहेत. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून परमबीर सिंग यांनाही याप्रकरणात लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *