Breaking News

अन्नधान्य पुरवठ्यासाठी अपुरे मनुष्यबळ असतानाही मुंबई ठाण्यात १ हजार कर्मचारी कार्यरत जनतेची गैरसोय होवू नये यासाठी संघटनेकडून राज्य सरकारबरोबर सहकार्य

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे आर्थिक गोष्टींबरोबरच जेवण-खाण्याची सोयी बंद झालेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कष्टकरी, कामगार आणि गरिब-गरजूंना धान्य मिळावे यासाठी रेशनिंग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई- ठाणे मिळून जवळपास ११६६ अधिकारी-कर्मचारी यासाठी झटत असल्याची माहिती मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी दिली.
अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी नियंत्रक शिधावाटप- ०१, उपनियंत्रक शिधावाटप- ०७, शिधावाटप अधिकारी- ४६, सहायक शिधावाटप अधिकारी- १३८, शिधावाटप निरीक्षक – ४४९, लिपीक- ३१३, व इतर कर्मचारी-२१२ आदी जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे एकूण १८९० पैकी ११६६ पदे भरलेली आहेत व ७१४ रिक्त पदे प्रशासनाने अद्यापही रिक्त ठेवली असून तरीही संख्याबळाचा विचार न करता आम्ही कामे करत असल्याचे ते म्हणाले.
मुंबई, ठाणे विभागातील प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत सुमारे ४२२३ अधिकृत शिधावाटप दुकानांमार्फत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. एप्रिल महिन्यात अन्नसुरक्षा तांदूळ गहू सुमारे ३६८८१ मेट्रिक टन, मोफत तांदुळ ३६५५४ मेट्रिक टन व मे महिन्याकरीता आत्तापर्यंत गैरलाभार्थी ३१३४ मेट्रिक टन अन्नधान्य मुंबई/ठाणे विभागासाठी वितरीत करण्यात आलेले आहे. विभागातील विभाग प्रमुख नियंत्रक शिधावाटप, सर्व उपनियंत्रक शिधावाटप, शिधावाटप अधिकारी, सहायक शिधावाटप अधिकारी,शिधावाटप निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम चोखपणे बजावत आहेत. तसेच काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम देखील करत आहे. अन्नधान्याचा कुठेही काळा बाजार होणार नाहीत याकरीता ४४ दक्षता पथके नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *