Breaking News

मंत्रालयातले आणखी एक प्रधान सचिव पॉझिटीव्ह पाच दिवसापूर्वी नामांकित रूग्णालयात दाखल

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यात कोरोना नामक विषाणूने चांगलाच धुमाकुळ घालत असून गेली काही दिवसांपासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबरच आता प्रधान सचिव बाधीत होत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातच आणखी एका प्रधान सचिवाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
साधारणत: ४ ते ५ दिवसांपूर्वी एका प्रधान सचिवाला मंत्रालयात अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी स्वत:ची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सदर प्रधान सचिवांना तातडीने मुंबईतील एका नामवंत रूग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या सनदी अधिकाऱ्यांची पत्नी डॉक्टर असून त्यांच्या लक्षात वेळीच ही गोष्ट आल्याने त्यांनी तातडीने रूग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव, इतर विभागात काम करणारा एक उपसचिवांना कोरोनाची बाधा झाली. त्यात आता या नव्या प्रधान सचिवांमुळे आता ही संख्या तीनवर पोहोचली.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *