Breaking News

मुंबईत २५ हजार तर राज्यात ४० हजारावर रूग्ण संख्या पोहोचली ५ व्या दिवशीही रूग्णांची २ हजार ३४५ रूग्ण आणि ६४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या मुंबई सह महाराष्ट्रात लाखांच्या घरात पोहोचणार असल्याचे भाकित करण्यात आले होते. मात्र रूग्ण संख्येवर किमान पक्षी नियंत्रण ठेवत राज्य सरकारने प्रयत्न केलेले असले तरी अखेर राज्यातील रूग्णांची संख्येने ४० हजाराचा टप्पा करत ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात २ हजार ३४५ रूग्णांचे निदान झाले तर ६४ जणांचा मृत्यू झाला. तसेच मुंबई शहरातही रूग्णांची संख्या २५ हजार ५०० वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिवसभरात १४०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले असून त्यांची संख्या ११ हजार ७२६ वर पोहोचली आहे. ( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २४२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.)
मृत्यू –राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या – आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,१९,७१० नमुन्यांपैकी २,७८,०६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१,६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,८९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६४.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
1. आजपर्यंत राज्यातून ११,७२६ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात ४,३७,३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६,८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २५५०० ८८२
ठाणे          ३३८
ठाणे मनपा २०४८ ३३
नवी मुंबई मनपा १६६८ २९
कल्याण डोंबवली मनपा ६४१
उल्हासनगर मनपा १३१
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८०
मीरा भाईंदर मनपा ३६२
पालघर १०२
१० वसई विरार मनपा ४२५ ११
११ रायगड २८५
१२ पनवेल मनपा २७१ ११
  ठाणे मंडळ एकूण ३१८५१ ९९३
१३ नाशिक ११३
१४ नाशिक मनपा ८४
१५ मालेगाव मनपा ७१० ४३
१६ अहमदनगर ४७
१७ अहमदनगर मनपा १९
१८ धुळे १५
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २५२ २९
२१ जळगाव मनपा ७९
२२ नंदूरबार २६
  नाशिक मंडळ एकूण १४२५ ९४
२३ पुणे २५५
२४ पुणे मनपा ४२०७ २२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०३
२६ सोलापूर १०
२७ सोलापूर मनपा ५१२ २७
२८ सातारा १८४
  पुणे मंडळ एकूण ५३७१ २६४
२९ कोल्हापूर १४१
३० कोल्हापूर मनपा २०
३१ सांगली ५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १२३
  कोल्हापूर मंडळ एकूण ३५७
३५ औरंगाबाद २०
३६ औरंगाबाद मनपा ११०६ ३९
३७ जालना ४३
३८ हिंगोली ११०
३९ परभणी १५
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १२९७ ४०
४१ लातूर ५१
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद १९
४४ बीड १३
४५ नांदेड ११
४६ नांदेड मनपा ८१
  लातूर मंडळ एकूण १७८
४७ अकोला २९
४८ अकोला मनपा ३१५ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा १३१ १२
५१ यवतमाळ १११
५२ बुलढाणा ३८
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६४१ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४३४
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ४७४
  इतर राज्ये /देश ४८ ११
  एकूण ४१६४२ १४५४

Check Also

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *