Breaking News

घाटकोपरमध्ये विमान कोसळून ५ ठार मुंबईत पहिल्यांदाच नागरी भागात विमान कोसळण्याची घटना

मुंबई : प्रतिनिधी

आज दुपारी १.१८ मिनिटांनी घाटकोपर परिसरातील सर्वोदय नगर भागात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या विमान अपघातात पायलटसह ५ जण ठार झाल्याची घटना घडली. जुहू हेलिपँडवरून हे विमान चाचणीच्या उद्देशाने निघाले होते. तेव्हा विमानात बिघाड झाल्याने जीवदया लेन इथल्या इमारतीचे बाधकाम सुरु असलेल्या परिसरात हे विमान कोसळले. या अपघातात एका पादचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

दिपक कोठारी यांच्या युवाय एव्हीऐशन या कंपनीच्या मालकीचे विमान होते. व्हीटी..युपीझेड सी९० या जातीचे हे विमान होते. उत्तर प्रदेश सरकारकडे असलेले हे विमान २०१४ साली युवाय या कंपनीने खरेदी केले होते. या विमानाचा उत्तर प्रदेशातील अलहाबाद येथेही अपघात झाला होता. हवाई विभागाच्या माहितीनुसार सी९० हे विमान २३ वर्षे जुने होते.

दरम्यान, मुंबईच्या नागरी भागात विमान कोसळून दर्घटना घडण्याची ही पहिलीच घटना असून डीजीसीए या अपघाताची चौकशी करणार आहे. या विमानात पायलटसह ४ जण होते. कँप्टन मारिया कुबेर, कँप्टन प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनिष पांडे यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *