Breaking News

बार आणि पब सोडून रात्रीची मुंबई जागी राहणार नाईट लाईफचा पहिला टप्पा २७ जाने.पासून सुरू होणार असल्याची पर्यटन मंत्री ठाकरे, गृह मंत्री देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रात्री झोपणाऱ्या मुंबईला जागे राहणास अर्थात नाईट लाईफ सुरू ठेवण्यासंदर्भात कायदेशीर परवानगी देण्याचा विचार अखेर सत्यात उतरणार आहे. मुंबई नाईट लाईफच्या पहिल्या टप्प्यात परमिट रूम, बिअर बार, पब वगळता चित्रपट थिएटर, खाऊ गल्ली, मिल कंपाऊंडमधील मॉल्स, दुकाने सुरु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या पहिल्या टप्प्यातील संकल्पनेची सुरुवात २७ जानेवारी २०२० रोजी पासून करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते.
मुंबई नाईट लाईफ ही संकल्पना तीन टप्प्यात लागू करण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात चित्रपट थिएटरस, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉईंट आणि मिल्स कंपाऊंड परिसरातील खाद्यान्न विक्रीची दुकाने, इतर वस्तुंची दुकाने २४ तास सुरु राहणार आहेत. मात्र या परिसरातील दुकाने चालूच ठेवली पाहिजे असे बंधन या भागातील दुकानदारांवर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तुर्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून बिअर बार, परमिट रूम, पब आदी मात्र २४ तास सुरु ठेवण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच सध्या तरी उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यात दुरूस्ती करण्याचा विचार नाही. तसेच फक्त नाईट लाईफमध्ये मॉल्स, दुकाने, चित्रपटगृहे आणि फूड कोर्ट सुरु राहणार आहेत.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *