Breaking News

महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त  जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु 

महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके मोठ्या संख्येने आजारी असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ० ते १८ वयोगटातील ९ लाख ६४ हजार ३८४ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबवण्यास सुरुवात केली होती. याअंतर्गत आतापर्यंत ९६ हजार ७३७ शाळा आणि १ लाख १० हजार ४७३ अंगणवाड्यांमध्ये २ कोटी ४९ लाख ५४ हजार २५७ बालकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.

या आरोग्य तपासणीत राज्यातील एकूण साडे नऊ लाखांहून अधिक बालके आजारी असल्याची धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे. या अभियानाअंतर्गत धक्कदायक माहिती समोर आली आहे. राज्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील ७३ लाख ४ हजार ८२ बालकांची तपासणी आरोग्य विभागाअंतर्गत करण्यात आली. यापैकी १३ हजार ९०५ बालकांना जन्मजात व्यंग असल्याचं आढळून आलं आहे.

१३ हजार ९०५ बालकांमध्ये ५१३ बालकांना न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, ५०० बालकांना डाऊन सींड्रोम, क्लेफ्ट लीप आणि क्लेफ्ट पॅलेट (फाटलेले ओठ आणि टाळू) असलेल्या बालकांची संख्या १ हजार २०७, क्लब फूट असलेल्या बालकांची संख्या ८३३, जन्मजात मोतीबिंदू असलेले बालक ३८, जन्मजात बहिरेपणा आढळलेले बालक १ हजार ७९६, जन्मजात हदयविकार ५ हजार २५१ आणि इतर जन्मजात व्यंग असलेल्या बालकांची संख्या ३ हजार ८१ इतकी आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

काळे मनुके रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात हे ५ फायदे रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून

काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी आणि तब्येसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *