Breaking News

रोहित शर्मा’ने बंगळुरूत घडवला इतिहास

विश्वचषक २०२३ स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रम केला आहे. तो अशी कामगिरी करणारा भारताचा फक्त तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रोहितने सलामीला फलंदाजी करताना ८ चेंडूत १५ धावा केल्या. रोहितने १२ धावांचा टप्पा पार करताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १४ हजार धावा पूर्ण केल्या. या धावा त्याने ३१२ सामन्यातील ३२५ डावात पूर्ण केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४० शतके आणि ७१ अर्धशतकेही निघाली.

रोहितपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी वीरेंद्र सेहवाग आहे. त्याने ३२१ सामन्यांतील ३८८ डावांमध्ये ४१. ९० च्या सरासरीने १५७५८ धावा केल्या आहेत. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ३४६ सामन्यातील ३४२ डावात ४८. ०७च्या सरासरीने १५३३५ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा याची बॅट वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. रोहितने आतापर्यंत ४६०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि २ अर्धशतकेही निघाली आहेत. रोहितची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या १३१ आहे. ही धावसंख्या त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केली होती.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *