Breaking News

आरोग्य मंत्री टोपेंचे कोरोनाच्या चवथ्या लाटेबाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले… फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये

मागील दोन वर्षाहून अधिक काळ कोरोनाने संपूर्ण जगभरातच थैमान घातले. मात्र कोरोनामुळे वाढत्या लसीकरणामुळे कोरोनाला रोखण्यात चांगल्यापैकी यश आहे. तसेच अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. महाराष्ट्रासह देशातही कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आलेले असले तरी महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत धीम्यागतीने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हि रूग्णवाढ फारसं भीतीदायक किंवा गंभीर नसल्याचे वक्तव्य केले.
ते पुण्यात बोलत होते.
महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने सर्वच गोष्टींवरील निर्बंध हटविले. त्याचबरोबर मास्क सक्तीचा निर्णयही बंधनकारक न ठेवता ऐच्छिक स्वरूपाचा करण्यात आला. त्यामुळे आता राज्यातील नागरीकही फारसे मास्क वापरताना दिसत नाहीत. एकाबाजूला या सर्व गोष्टींमुळे राज्यातील नागरीकांनी कोरोनाच्या संकटातून सुटकेचा श्वास सोडल्याचे दिसत असताना मात्र राज्यात कोरोनाच्या संख्येत धिम्या गतीने वाढ होत असल्याचे दिसून येवू लागले. त्यामुळे कोरोनाची चवथी लाट येणार की काय अशी शंका सर्वसामान्य नागरीकांच्या मनात चुकचुकायला लागली आहे.
त्यावर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक विधान केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
दोनच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मात्र यासंदर्भात आज टोपेंनी दिलासादायक स्पष्टीकरण देत म्हणाले की, मास्कबाबतचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. एक नक्की आहे की १००-१२५ संख्येनं आज रुग्णसंख्या वाढतेय. पण ते फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये. कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही.
दरम्यान, ज्या राज्यांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, अशा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा केल्याचं सांगत मी गुजरातला होतो. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय, तिथल्या आरोग्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांचे म्हणणं आहे की रुग्ण वाढत आहेत हे खरंय. पण अतिशय सौम्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं मोठं प्रमाण दिसत नाही. गृह विलगीकरणातच रुग्ण बरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तशी घाबरण्याची परिस्थिती नक्की नाही. आपल्याकडे तेवढी परिस्थिती देखील गंभीर नाही. आपल्याला सगळं बंद करून चालणार नाही, पण थोडी सतर्कता सगळ्यांनी ठेवली पाहिजे अशी इशारावजा सूचनाही त्यांनी नागरीकांना आणि प्रशासकीय यंत्रणांना केली.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *