Breaking News

शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत हिंदूत्ववादाचे राळ उठविली. मात्र खरी कविता काय आहे. त्यामुळे नेमकी कविता काय आहे आणि त्याचा मतीतार्थ समजावा म्हणून खास मराठी ई-बातम्याच्या वाचकांशी ही कविता.

पाथरवट
आम्ही पाथरवट,
निर्माण करतोय चक्कीचे पाट,
ज्या पाटांनी पीठ अन् रोटी दिलीय तुम्हाला
आम्ही मात्र अन्नाच्या कणासाठी
रोजच नुसती घरघर करतोय.
दुसरं काय दुर्दैव आमचं…
आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून
आम्ही निर्माण केलेल्या जात्यातून
आम्हीच पिसले जातोय
आमच्या छिन्नी अन् हातोड्यांनी
एकदा तर कमालच केली
पाषाणातून वेरूळ, अंजिठा कोरल्या गेली.
उध्दवस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून
शिल्पांच सौदर्य तुम्ही पाहता, अन् म्हणता
वा! वाहवा! बहोत खुबसुरत ! !
तुमच्या ब्रम्ह, विष्णू, महेशाला
लक्ष्मीला अन् सरस्वतीला
आम्हीच रूपडं दिलय.
आता तुम्हीच खर सांगा-
ब्रम्हदेव आमचा निर्माता की
आम्हीच ब्रम्हदेवाचे पिता?
अरे ! आमच्या छिन्नी अन् हातोड्यासाठी
कार्ल मार्क्स सारखा आधुनिक योध्दा
आमच्या जवळ इंद्राचं सोंग घेवून आला,
त्याला आम्ही निराश केलं नाही.
उदार कर्णाप्रमाणे कवच अन् कुंडले
त्याच्याही झोळीत आम्हीच टाकलीत
अन् त्याच जोरावर क्रांती आणायला निघालोय
‘जगातील कामगारांनो एक व्हा !’
आता आम्हीही संघटीत होत आहोत
जेव्हा आम्ही उघडू आमचा तिसरा डोळा
तेव्हा तुम्हीच बघालच केविलवाण्या नजरेनी
तुमच्यातल्या अघोरी भस्मासुराचा शेवट झाल्याचे.
आमच्या श्रमातून, घामातून
ठिणगी पडते
या पडलेल्या ठिणगीतून
तुमची सारी दैवतं, पुराणं
जळूण खाक करणार आहोत.
आता चक्र उलटे फिरेल
विकृत माथा तुमचा अन् सोटा आमचा,
अजूनही आमच्या मजबूत हाताता,
छिन्नी अन् हातोड्यांत
ताकद आहे, तुमच्यातला माणुस घडविण्याची
त्यावेळी वेरूळ अजिंठ्यातील
सारी भग्न शिल्पे गर्जना करतील
we are equal
we want justice
we want justice.

कवी-जवाहर राठोड

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *