Breaking News

आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी रूग्णसंख्या मुंबईसह राज्यात तब्बल २९४० रूग्णांपैकी २२४९ एकट्या मुंबईत: राज्याची संख्या ४४ हजार ५०० वर

मुंबई: प्रतिनिधी
मागील २४ तासात राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ९४० रूग्णांचे निदान झाले. यापैकी मुंबईत २२४९ रूग्णांचे निदान झाले. तर ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्या १५१७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली तर आज ८४० जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजस्थितीला कोरोनाबाधीत अॅक्टीव असलेल्या रूग्णांची संख्या ४७४ वर पोहोचली आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्ण २ हजार २४९ इतके रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साता-यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १५१७ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या – आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,३२,७७७ नमुन्यांपैकी २,८८,१९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४४,५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना – राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,१५४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे – 1.आजपर्यंत राज्यातून १२,५८३ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 2.सध्या राज्यात ४,६९,२७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८,४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २५९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २७२५१ ९०९
ठाणे          ३६६
ठाणे मनपा २२३४ ३४
नवी मुंबई मनपा १७७६ २९
कल्याण डोंबवली मनपा ७२७
उल्हासनगर मनपा १४४
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८२
मीरा भाईंदर मनपा ३८८
पालघर १०७
१० वसई विरार मनपा ४५१ १४
११ रायगड २९९
१२ पनवेल मनपा २८२ १२
  ठाणे मंडळ एकूण ३४१०७ १०२७
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा ९३
१५ मालेगाव मनपा ७१० ४४
१६ अहमदनगर ४९
१७ अहमदनगर मनपा २२
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २८६ ३६
२१ जळगाव मनपा १०९
२२ नंदूरबार ३२
  नाशिक मंडळ एकूण १५१३ १०३
२३ पुणे २८३
२४ पुणे मनपा ४४९९ २३१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २११
२६ सोलापूर १०
२७ सोलापूर मनपा ५२२ ३२
२८ सातारा २०४
  पुणे मंडळ एकूण ५७२९ २८०
२९ कोल्हापूर १७५
३० कोल्हापूर मनपा २०
३१ सांगली ६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १३५
  कोल्हापूर मंडळ एकूण ४११
३५ औरंगाबाद २२
३६ औरंगाबाद मनपा ११६५ ४२
३७ जालना ४६
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १३६७ ४३
४१ लातूर ५८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद २६
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
  लातूर मंडळ एकूण २११
४७ अकोला ३१
४८ अकोला मनपा ३३६ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा १३६ १२
५१ यवतमाळ ११३
५२ बुलढाणा ३९
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६७२ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४५७
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया २८
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ५२४
  इतर राज्ये /देश ४८ ११
  एकूण ४४५८२ १५१७

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *