Breaking News

आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर ऑगस्टमध्ये १२.१ टक्के दर

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या म्हणजेच मुख्य क्षेत्रांच्या विकास दराबाबत चांगली बातमी आली आहे. ऑगस्टमध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचा वाढीचा दर या वर्षी ऑगस्टमध्ये १२.१ टक्के या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी जुलै महिन्यात या प्रमुख उद्योगांचा विकास दर ८.४ टक्के होता, तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर ४.२ टक्के होता.

पायाभूत उद्योगांच्या वाढीचे असे चांगले आकडे १४ महिन्यांपूर्वी आले होते. ऑगस्टमध्ये गेल्या १४ महिन्यांतील सर्वाधिक वाढीचा दर आहे. मागील उच्च पातळी जून २०२२ मध्ये होती आणि त्यावेळी ८ प्रमुख क्षेत्रांचा विकास दर १२.२ टक्के होता.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीत म्हटले की, कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे ऑगस्ट महिन्यात मूलभूत क्षेत्राच्या वाढीला आधार मिळाला आहे. त्यामुळे हा महिना सर्वोत्तम आहे. ऑगस्टमध्ये रिफायनरी उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि वीज क्षेत्राच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून येते.

ऑगस्टमध्ये देशातील ८ प्रमुख क्षेत्रांपैकी ५ उद्योगांमध्ये दुहेरी अंकी वाढ नोंदवण्यात आली. सिमेंट क्षेत्रात १८.९ टक्के, कोळसा क्षेत्रात १७.९ टक्के, वीज क्षेत्रात १४.९ टक्के, पोलाद क्षेत्रात १०.९ टक्के आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात १०.० टक्के विकास दर नोंदवला गेला आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (एप्रिल-ऑगस्ट) आठ प्रमुख क्षेत्रांचा उत्पादन वाढीचा दर ७.७ टक्के राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर १० टक्के होता.

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *