Breaking News

आठवलेंच्या पाठराखण आणि वानखेडेंच्या दाव्याला आंबेडकरी संघटनांचा विरोध वानखेडे तुम्ही आंबेडकरवादी नाहीत, खोटा प्रचार करू नका

मुंबई: प्रतिनिधी

सध्या राज्यात गाजत असलेला समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून आज पुन्हा वानखेडे परिवाराने रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांची भेट घेवून आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे घोषित केले. परंतु एवढया दिवसात हे कुटुंब हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत आहेत. ते आंबेडकरवादी आहेत हा खोटा अपप्रचार कदापी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आमचे नेते आहेत, पँथर आहेत. त्यांचा आंबेडकरी समाज सन्मान करतो. परंतु त्यांनी समीर वानखेडे यांना पाठीशी घालू नये. समीर वानखेडे हे आंबेडकरीवादी असते तर त्यांनी आंबेडकरी चळवळीत योगदान दिल्याचे अन्यथा आंबेडकरीवादी असल्याचा एखाद्या पुरावा सोशल मिडीयावर सादर करावा, असे आव्हान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी बोलताना केले.

लवकरच राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आयोग व जात पडताळणी विभागात भेटून समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीची चौकशी करण्यास पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर दलित कार्यकर्त्ये उत्तम गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे व कुटुंबाला दिलेला पांठिंबा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आंबेडकरी दलित मागासवर्गिय समाजास मारक आहे. वानखेडे कुटुंबाच्या न्यायासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाला भेटणार ही त्यापेक्षाही दुर्दैवी बाब असल्याची खंत व्यक्त केली.

मागासवर्गीयांचे लाभ मिळविण्यासाठी कोणीही दलित समाजाचे बनावट सर्टिफिकेट बनविते आणि काही अडचणी आल्यास आठवले साहेबाकडे जायाचे त्यांनी त्यांच्या पाठिशी उभे रहायचे अशी नवी प्रथाच सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यकाळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ना.आठवले साहेब आणि पत्रकारांना समिरच्या कुटुंबाने मागासवर्गिय महार म्हणून पुरावे सादर केले आहेत. परंतु लहानपणी शाळेत नाव दाखल करताना मुला-मुलींची जात काय आहे हे का दाखविले नाही बौद्ध (पूर्वीचे महार) म्हणून किंवा हिंदु म्हणून शाळेत टाकले त्याचे पुरावे का सादर केले नाही. समीरचे व त्याच्या बहिणीचे नाव मुसलमान समाजासारखे का ठेवले (समीर जरीही जनरल नांव असले तरी) याचाच अर्थ ते जन्माने मुस्लिम आहेत. याचीही माहिती रामदास आठवलेंनी घ्यायला पाहिजे होती अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांला कोणीही भेटू शकते, न्याय मागू शकते. परंतु थेट त्यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिल्याचे कोठेही ऐकले नाही. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे समीरच्या कृत्याची पाठराखण करत आहे असेच माध्यमातून दिसून येत आहे आणि आपली खुर्ची टिकविण्यासाठी व भाजपाला खुष करण्यासाठीचे प्रयत्न आठवले यांचे दिसून येत असल्याचा आरोपही उत्तम गायकवाड यांनी केला.

Check Also

भारतातील सामाजिक लढ्यातील शिलेदार डॉ. ऑम्व्हेट यांचे निधन सांगलीतील कासेगांव येथे अंत्यसंस्कार

सांगली-मुंबई: प्रतिनिधी अमेरिकेसारख्या देशात जन्माला येवून ही तेथील भौतिक आणि सधनतेचा कोणताही मोहात न अडकता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *