Breaking News

नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी

दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग सुविधा केंद्र उभारले आहे. उद्योजक, व्यावसायिक विशेषत: नवउद्योजकांसाठी हे सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे. ऐस टेक्नॉलॉजिचे विशेष सहकार्य यासाठी मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मुंबई विभाग प्रमुख अरुण धनेश्वर, अेस टेक्नॉलिजे सीईओ विनोद अगरवाल यांच्या उपस्थितीत केंद्राचा शुभारंभ झाला.

शासकीय चौकटीत राहून जी मदत करता येईल ती नक्कीच करू. स्वत:चा विकास करण्यासोबत समाजाचा विकास सुद्धा करु यासाठी डिक्की परिपूर्ण आहे. असे उदगार सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी काढले.

नवउद्योजकांच्या वाढीसाठी या सुविधा केंद्राची उभारणी केलेली असून एससी/ एसटी समाजातील उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले.

कंपनी नोंदणी, जीएसटी नोंदणी, कर भरणा, आयकर परतावा, एमएसएमई नोंदणी आदींविषयी माहिती आणि कार्यवाही या केंद्रामार्फत होणार आहे. ८-१ पहिला मजला, चन्द्रोदय् सोसायटी, स्वस्तिक पार्क, एस जी बर्वे मार्ग, चेम्बुर येथे डिक्कि सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *