Breaking News

कोरोनाची भीती नका बाळगू मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भय‍भीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नकाहोळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणेनागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कीकोरोनाबाबत नागरिकांमध्ये जी भिती पसरली आहे ती दूर करण्यासाठी राज्यशासनाने पावले उचलावीत. जनजागृती मोहिम हाती घ्यावीअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणालेकोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.

 कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे.

 ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. राज्यात येणाऱ्या होळीच्या उत्सवावर कोरोनाचा सावट असून या होळीमध्ये कोरोनाच संकट जळून खाक व्हावे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावेअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली असून शाळासार्वजनिक ठिकाणेरेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्सबॅनर्स लावण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींसाठी जाणीव जागृतीचे चर्चासत्र घेण्यात येणार असून त्यानंतर आपल्या भागातील नागरिकांचे लोकप्रतिनिधींनी प्रबोधन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये तर काळजी  घ्यावीअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटीलसुधीर मुनगंटीवारनितेश राणेरविंद्र वायकरसुनील प्रभूप्रताप सरनाईकरवी राणाराम कदम यांनी चर्चेत सहभाग घेतला

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *