Breaking News

स्मशानभूमीतील दहनासाठी लागणाऱ्या लाकडाच्या पुरवठ्यातही घोळ लाकडे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारास मुंबई महापालिकेची नोटीस

मुंबईः प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्मशानभूमीत मयत व्यक्तीला ३०० किलो सुकी लाकडे पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली. मात्र या लाकडांच्या पुरवठ्यातही कंत्राटदाराने घोळ घातल्याची बाब उघडकीस आली असून संबधित पुरवठादारास पालिका प्रशासनाने नोटीस बजाविली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पालिका प्रशासनाने मुलुंड टी वॉर्डातील कंत्राटदार के. व्ही. परुळेकर यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुलुंड पश्चिम डंपिंग ग्राउंड जवळील स्मशानभूमीत ओली आणि कमी दर्जाची लाकडे पुरवठा करत असल्याची तक्रार केली होती. येथील सहायक आयुक्त के. बी. गांधी यांनी ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र शिंगाणपूरकर यांनी कारणे दाखवा नोटीस जारी करत स्पष्ट केले आहे की तक्रार पडताळणी नंतर आपणास जबाबदार का धरु नये आणि आपला ठेका का रद्द करु नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
नागरिकांनी तक्रार करणे आवश्यक असून पालिका प्रशासन आता अजून कठोर कार्यवाही करेल. मुंबईतील सर्व स्मशानभूमीत अशाच सावळागोंधळ सुरु असून त्या- त्या वॉर्डातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी वर्गानी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *