Breaking News

शरद पवारांनी दिले संकेत, राज्यातही पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार राज्य सरकारशी याप्रश्नी बोलणार असल्याची स्पष्टोक्ती

बारामती: प्रतिनिधी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला बसणारी महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून कधी असा निर्णय घेणार अशी विचारणा होत असतानाच राज्यातही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास …

Read More »

पुणे-अहमदनगर-नाशिककरांसाठी खुषखबर: लवकरच बुलेट ट्रेन महारेलच्या माध्यमातून होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई: विशेष प्रतिनिधी मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पुणे-अहमदनगर-नाशिक दरम्यान आणखी एक बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील हालचाली युध्दपातळीवर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती नुकतीच हाती आली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याचा पंतप्रधान …

Read More »

अजित पवार गैरहजर, शरद पवारांनी सांगितले हे कारण… कर्मचाऱ्यांना कोरोना तर अजित पवारांना कोरोनाची लक्षणे

बारामती : प्रतिनिधी मागील वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी दिवाळी सणाच्या पाडव्याला बारामतीतील गोविंद बागेतील आपल्या घरी शरद पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय हजर राहून दिवाळी साजरी करतात. तसेच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांनाही शुभेच्छा देतात. मात्र यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे आजच्या दिवशी हजर …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा काय केल्या मागण्या सेवा समाप्ती आणि काढून टाकण्याची कारवाई नको

मुंबई: प्रतिनिधी आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटी महामंडळाला कोरोना लॉकडाऊनमुळे आणखीनच आर्थिक नुकसानीत गेल्याने कर्मचाऱ्यांना पगार देणेही महामंडळाला मुश्किल बनले. त्यातच राज्य सरकारचीही अवस्था फारशी समाधानकारक नसल्याने राज्य सरकारलाही निधी देताना हात आखडता घेतला. यापार्श्वभूमीवर आपल्याला विविध मागण्याप्रश्नी संपाचे हत्यार उपसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयाने बेकायदा ठरविल्याने अखेर या कर्मचाऱ्यावर कारवाई …

Read More »

भाजपाला जितका वेळ पराभूत करणार तितके पेट्रोल-डिझेलचा भाव कमी होत राहणार ही लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार आणि केंद्राची ही सततची लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी …

Read More »

जय भिम: स्वत:बरोबर व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांना प्रश्न आदीवासींचे प्रश्न, पोलिस दलांकडून होणारा अन्याय आणि व्यवस्थेची उदासीनता

भारतरत्न, स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि निरोगी (कोणत्याही अभिलाषेला, धर्माला बळी न पडणारा) समाज निर्मिती करण्यासाठी कायदेशीररीत्या काय करायला हवे आणि काय नको करायला पाहिजे या गोष्टींचा एक प्रकारे धडाच राज्यघटनेच्या माध्यमातून संबध भारतीयांना घालून दिला. परंतु या लोकशाहीप्रधान असलेल्या भारतात लोकशाही संसाधनांचा वापर …

Read More »

अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आले भान: पेट्रोल-डिझेल इतक्या रूपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील ८ ते ९ महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ३० पैसे ४५ पैशाने वाढ करत पेट्रोलच्या दराने ११० रूपयांचा टप्पा पार केला. तर डिझेलनेही १०० री पार करत महागाई वाढीला हातभार लावला. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या भाव वाढीमुळे नागरीकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

परमबीर सिंग म्हणतात, “आता मला काहीही माहिती देण्याची इच्छा नाही” ऑक्टोंबर महिन्यात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात परमबीर यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर येवून कोणत्याही प्रकारची माहिती आणि पुरावे सादर करण्याची इच्छा नसल्याचे प्रतिज्ञा पत्र चांदिवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणात आपल्याला कोणाचीही उलट तपासणी किंवा …

Read More »

आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या राज्यमंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणीखोरी, वसुली, आणि भ्रष्टाचारा संबंधातील आरोपांच्या सर्व मर्यादा पार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या तोंडाला काळे फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रतीक काळे नावाच्या युवकाने गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून …

Read More »

काँग्रेस दाखल करणार किरीट सोमय्यांच्या विरोधात एक रूपयाची याचिका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »