Breaking News

राज्य सरकारचा मोठा निर्णय: नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे जारी, अन्यथा दंड सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

 मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत दिले हे आदेश रुग्णालये, कोविड केंद्र इमारती, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन …

Read More »

या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात ७ महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण कोरोना व्हेरिएंटमुळे घसरण झाली बाजारात

मुंबई: प्रतिनिधी सेन्सेक्सने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६५० अंकांची घसरण नोंदवली. याचे मूळ कारण कोरोनाचे नवीन प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ७ महिन्यांतील बाजारातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. १८ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स ६१,७६५ वर बंद झाला. तो जानेवारीत ४८ हजारांवर बंद झाला. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर रोजी …

Read More »

सेरोप्रिव्हेलन्स संशोधनानुसार १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आवश्यक दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये अँटिबॉडीज सेरोप्रिव्हेलन्सचं प्रमाण ९२ टक्के, तर लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये फक्त ६८ टक्के

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी संशोधनाबाबत लोकसंख्या/समुदायातील प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यास महत्त्वाचा आणि आवश्यक होता. SARS-CoV-2 संसर्ग, संसर्गासाठी लोकसंख्या आधारित निर्देशक आणि साथीच्या रोगांवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी समुदायाच्या प्रतिसादाचे मोजमाप करण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आयसीएमआर या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून …

Read More »

काँग्रेसच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजार रू. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : प्रतिनिधी कोविड काळात मृत्यूमुखी पावणाऱ्यांच्या वारसांना मदत काय देणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केल्यानंतर त्या वारसांना ५० हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाही मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राने राज्याला पत्र पाठविल्यानंतर ५० हजार ही फारच तुटपुंजी रक्कम असून त्याऐवजी ४ लाख रूपयांची …

Read More »

निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर पहिल्या टप्प्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार

पुणे: प्रतिनिधी राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका …

Read More »

पटोले केंद्रीय मंत्री राणेंना म्हणाले, नवीन कुडमुडे ज्योतिष्यी… भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार!: नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना …

Read More »

परमबीर सिंग चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार ठाणे, एस्पप्लेंनेंड न्यायालयासमोर हजेरी

मुंबईः प्रतिनिधी तब्बल २५० दिवसाहून अधिक काळ गायब झालेले परमबीर सिंग यांनी काल हजेरी लावत ठाणे गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ठाणे न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या विरोधात पुन्हा न्यायालयात हजर होत सदरचे वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावर ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केल्यानंतर त्यांनी …

Read More »

स्वस्तात घर खरेदीची संधी, पीएनबी करणार लिलाव ई-ऑक्शनद्वारे स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी

मुंबईः प्रतिनिधी तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. पीएनबी या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २६ नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातात. पीएनबीने …

Read More »

सुरक्षा यंत्रणा सरकारच्या वेठीला, मुंबईकर वाऱ्यावर ! सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम ठाकरे सरकारने रखडवली-भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांच्या सरबराईसाठी ठाकरे सरकारने पोलीस यंत्रणेस वेठीस धरल्याने राज्यातील जनतेची सुरक्षा संकटात सापडली आहे. दहशतवादी कारवायांचे अनेक कट केंद्रीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येऊनही, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात मात्र ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, मुंबईच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही राजकीय द्वेषातून …

Read More »