Breaking News

परमबीर सिंग चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार ठाणे, एस्पप्लेंनेंड न्यायालयासमोर हजेरी

मुंबईः प्रतिनिधी
तब्बल २५० दिवसाहून अधिक काळ गायब झालेले परमबीर सिंग यांनी काल हजेरी लावत ठाणे गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ठाणे न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या विरोधात पुन्हा न्यायालयात हजर होत सदरचे वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावर ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केल्यानंतर त्यांनी एस्पप्लेंनेंड न्यायालयासमोर हजर होत या न्यायालयानेही त्यांच्या विरोधात जारी केलेले वॉरंट रद्द करावे अशी मागणी केली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी आपण चांदिवाल आयोगासमोर पुढील आठवड्यात सोमवारी हजर होणार असल्याची हमी दिली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी रूपये खंडणी वसूलीचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला. या आरोपांच्या चौकशीसाठी आयोगाने अनेकवेळा परमबीर सिंग यांना जबाब नोंदविण्यासाठी अनेकवेळा नोटीस बजावली. परंतु प्रत्येकवेळी सिंग यांनी गैरहजर रहात वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले.
परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे पोलिस ठाण्यात आणि मुंबईतील गोरेगांव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही ठिकाणीही त्यांना चौकशी करण्यासाठी अनेकदा नोटीस बजाविण्यात आले. परंतु ते हजर झाले नाहीत. त्यामुळे एस्पप्लेंनेंड न्यायालयाने आणि ठाणे न्यायालयाने त्यांना हजर होण्याच्या नोटीसा बजाविल्या याशिवाय त्यांना फरार करण्याची प्रक्रिया सुरु केली.
परंतु अखेर ते काल स्वतः हजर झाल्याने आज ठाणे न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या विरोधात जारी केलेली अटक वॉरंट आणि फरार जाहिर करण्याची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली. त्यानुसार ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधातील प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर त्यांनी एस्पप्लेंनेंड न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांनी जारी केलेली नोटीस रद्द करावी अशी मागणी केली. त्यावेळी आपण चांदिवाल आयोगासमोरही जबाबसाठी हजर राहू अशी हमी दिली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *