Breaking News

स्वस्तात घर खरेदीची संधी, पीएनबी करणार लिलाव ई-ऑक्शनद्वारे स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी

मुंबईः प्रतिनिधी
तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. पीएनबी या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २६ नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे.
बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातात. पीएनबीने थककबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा आता लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये कमी किमतीत घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिली आहे. पंजाब नॅशनल बँक या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्तांचा समावेश आहे.
मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांनी ताब्यात घेतल्या आहेत. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.
पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये म्हटले की मेगा ई-लिलाव २६ नोव्हेंबर २०२१ रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ibapi.in/ या लिंकला भेट देऊ शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तेचे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, स्थान, मोजमाप आणि इतर माहिती दिली जाते. तुम्हाला ई-ऑक्शनद्वारे मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित मालमत्तेची कोणतीही माहिती मिळवू शकता. २९ डिसेंबर रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.
बोली लावणाऱ्यांना ‘या अटी पूर्ण कराव्या लागतील
– बोली लावणाऱ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल-आयडी वापरून ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी.
– त्यानंतर बोलीदारांनी आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावीत. KYC दस्तऐवजाची ई-लिलाव सेवा प्रदात्याकडून पडताळणी केली जाणार आहे. याला किमान दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात.
– यानंतर तुम्हाला ई-ऑक्शन प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या चालानचा वापर करून रक्कम हस्तांतरित करावी लागेल. आपण NEFT/हस्तांतरण किंवा ऑनलाईन/ऑफलाईन हस्तांतरण वापरू शकता.
– इच्छुक नोंदणीकृत बोलीधारक प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्पा पूर्ण केल्यानंतर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात.

Check Also

इन्फोसिस एडीआर न्यूयॉर्क बाजारात ७ टक्क्याने घसरली १५.३० निचांकीस्तरावर

सूचीबद्ध IT फर्मने FY25 साठी १-३ टक्के महसूल वाढीचा अंदाज नि:शब्द स्थिर चलन (CC) जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *