Breaking News

बैठकी दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन …

Read More »

म्हाडा घेणार ठाण्यात ६५ एकर जमिन तर राज्य सरकार देणार कामगारांची देणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला मुंबईत म्हाडाच्या मालकी हक्काच्या जमिनींचा साठा जवळपास संपुष्टात येत असल्याने परवडणारी घरे निर्माण करणे जिकरीचे बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या मफतलाल उद्योगासाठी दिलेली ६५ एकर जमिन परत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून या जमिनीवर परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीचा प्रकल्प …

Read More »

त्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, पाटील काय चीज आहे माहित नाही ४२ वर्षे झाली राजकारणात थोडी नाहीत

पुणे: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले की त्यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषेदेला सामोरे जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्या सूत्रांच हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना …

Read More »

राज्याची जगासमोर प्रतिमा पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारं असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. आघाडी सरकारच्या दोन वर्षा निमित्ताने आज प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते …

Read More »

NCB ने ड्रग्स कारवाईची माहिती देण्यास दिला सपशेल नकार ! संवेदनशील असल्याचे सांगत नकार दिला

मुंबई : प्रतिनिधी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागण्यात आली. परंतु अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने ही माहिती देण्यास सपशेल देण्यास नकार दिला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वेगवेगळ्या अर्जात अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोकडे माहिती मागितली होती, मागील ३ …

Read More »

आम्ही मोदींचे शिष्य, फेसबुक-ट्विटर कसे वापराचे हे त्यांच्याकडूनच शिकलो पवारसाहेबांचा फोटो मॉर्प करणार्‍या भाजपचा फर्जीवाडा समोर आणलाय - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारसाहेब आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त अजित पवार म्हणाले… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जनतेचे आभार

मुंबई : प्रतिनिधी “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, …

Read More »

स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी सुवर्ण रोखे योजना सोमवारपासून सुरू

मुंबई: प्रतिनिधी सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (सुवर्ण रोखे) गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड २०२१-२२ अंतर्गत २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी असेल. यावेळी सरकारने गोल्ड बाँडची किंमत ४,७९१ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. …

Read More »

आगामी वर्षापासून शाळांमध्ये द्विभाषिक अभ्यासक्रम लागू इंग्रजीतील दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत -प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच …

Read More »

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील ६३३ दिवसांनी बंदी उठवली, पण या देशावंर बंदी कायम १५ डिसेंबरपासून परदेशी प्रवासाला जाता येणार

मुंबई: प्रतिनिधी ख्रिसमस आणि नवीन वर्ष देशाबाहेर साजरे करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने १५ डिसेंबरपासून ६३३ दिवसांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या तीन दिवस आधी २२ मार्च रोजी  सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. १४ देशांच्या प्रवासावर बंदी कायम आता ज्या …

Read More »