Breaking News

नाना पटोलेंचा खोचक टोला, मुंबई महापालिकेची फक्त २ नाहीतर २५ वर्षांतील कामांची चौकशी करा कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात मविआ सरकारने केलेल्या कामाची जगाने दखल घेतली

राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची …

Read More »

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या एअरबस प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्रातून गुजरात येथे नेण्यात आलेल्या टाटा-एअर बस सी-२९५ या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. गुजरातमधील बडोदा येथे हे भूमिपूजन करण्यात आलं. एअरबस- टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, भयंकर महत्वकांक्षा आणि ढासळती… शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले टीकास्त्र

वेदांत फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापले आहे. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका़ सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी या तिन्ही प्रकल्पांवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी आपल्या ट्विटर हॅडलवरून आदित्य ठाकरे म्हणाले की, भयंकर महत्वकांक्षा …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त …

Read More »

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गेल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तूतू-मैमै करण्यापेक्षा.. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व पक्षिय बैठक बोलवावी

आधीच दोन मोठे प्रकल्प राज्यातून गुजरात गेल्यानंतर आज तिसरा उद्योग अर्थात सॅफ्रनचा प्रकल्पानेही आता महाराष्ट्राऐवजी हैद्राबादला पसंती दिल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली फारच सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सगळ्या घटनांवर …

Read More »

अरविंद सावंत म्हणाले, सरकार चालवायला लायक नाही हे सिध्द होतेय, सरळ…

वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा-एअरबस सारखा मोठा आणि महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच आता सॅफ्रन या विमान आणि रॉकेटसाठी इंजिन बनविणारी कंपनीचा नियोजित नागपूर मिहानमधून थेट हैद्राबाद येथे स्थलांतरीत झाल्याची माहिती हाती येत आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाने यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …

Read More »

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील वेळापत्रक राहणार असे

जवळपास एक महिन्याहून अधिक काळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यांत्रा कन्याकुमारी, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणानंतर आता ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवेश करत आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अर्थात जवळपास १४ दिवस …

Read More »

याला काय अर्थ आहे साने…आता मला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?

मी ही गोष्ट लिहित असताना आपले संजीव साने अनंतात विलिन होत असतील…! २००९ सालची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. मात्र, तेव्हाच महाराष्ट्रात एक आगळावेगळा प्रयोग केला गेला. राज्यातील सगळे डावे पक्ष, सगळे आरपीआय गट आणि …

Read More »

उदय सामंत यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, वेदांतबद्दल समजू शकतो पण एअर बस.. तुमच्यापासून दूर गेलो म्हणून इतका वाईट झालो का?

वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आज शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा …

Read More »