Breaking News

आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज आजपासून ऑनलाईन सुरु ७२० आणि २ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ) सुरु होत असून शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२ आहे. तर एमएमएस व …

Read More »

नवरात्र उत्सव मंडळांनो अधिकृत वीजजोडणी घ्या अन् अपघात टाळा अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ‘भारत जोडो यात्रे’ मुळेच रा.स्व. संघाला मुस्लीम समाज आठवला

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले इस्पित साधणाऱ्या भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाखालची वाळू या पदयात्रेमुळे सरकली आहे म्हणूनच आरएसएसला मुस्लीम समाजाची आठवण झाली असून सरसंघचालक …

Read More »

आदित्य ठाकरेंना भाजपाने पाच प्रश्न विचारत दिले आव्हान, आधी प्रकल्पाची जागा दाखवा

घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी …

Read More »

भाजपाचा इशारा, उद्धव ठाकरे… नाही तर आहे ते आमदारही गमवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी खोचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे …

Read More »

दसरा मेळावा: मुंबई महापालिकेचा निर्णय तथ्यहीन, उच्च न्यायालयाची ठाकरे गटाला परवानगी उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

बंडखोरीनंतर शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. मात्र या दोन्ही गटापैकी एकाला जरी परवानगी दिली तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी देण्यास नकार दिला. त्या विरोधात उध्दव ठाकरे गट आणि …

Read More »

निर्मला सीतारामन यांनी पुणे दौऱ्यात वेदांता फॉक्सकॉनच्या प्रश्नाला दिली बगल ज्या प्रकल्पांना विरोध केला त्याचा गुजरातला कोणता फायदा होणार होता

राज्यात तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नाणार प्रकल्प थांबविणारे लोक आता बोलत आहेत. हे सगळे हजारो कोटींचे प्रकल्प राज्याच्या हिताचेच होते. मुंबईमधील आर कारशेडला विरोध करणारे कोण आहेत ? या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्पाच्या …

Read More »

नारायण राणे यांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर, एवढी मिरची लागण्याची काय गरज? एखाद्या गुंडासारखी भाषणा केंद्रीय मंत्री बोलतायत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज गुरुवारी थेट पत्रकार …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या बाप चोरणारी टोळीला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, मग शिवाजी महाराज… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूष

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दुसऱ्याचे बाप पळविणारी टोळी सध्या सक्रिय असल्याची टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि नाव न घेता निवडणूका लढण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना …

Read More »

वेदांत-फॉक्सकॉन नंतर आता मोठ्या ऑनलाईन कपंनीने गुंडाळला महाराष्ट्रातून गाशा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केली त्या कंपनीची जाहिरात

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा ठरणारा तळेगाव येथील नियोजित ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगलेला असतानाच आता महाराष्ट्रातून आणखी एका मोठ्या ऑनलाईन कंपनीने गाशा गुंडाळत थेट कर्नाटकात गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये …

Read More »