Breaking News

एमपीएससी परिक्षेतील रँकेटप्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग सरकार कुणाला पाठीशी घालतेय? विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळावी म्हणून राज्य सरकारकडून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेण्यात येते. मात्र या आयोगाच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून त्या बदल्यात पैसे घेण्याचे प्रमाण उघडकीस आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपस्थित करत असे रँकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी आणि …

Read More »

पतसंस्थांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी पतसंस्थांनी नागरीकांकडून ठेवी स्विकारल्या. मात्र त्यातील अनेक पतसंस्था या आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत किंवा त्या दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने अशा बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या पतसंस्थाची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री …

Read More »

वेळ पडल्यास मंत्रीपद सोडेन.. नाणारप्रकरणी उद्योगमंत्र्यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी वेळ पडली तर मंत्रीपद सोडेन. पण, नाणार प्रकल्पाच्या विषयावर आपण कोकणातील माणसाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले. हुस्नबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …

Read More »

औरंगाबादच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जमिन उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरे यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादेतील कचरा डेपोचा प्रश्नाला गंभीर वळण लागलेले असल्याने त्याचे परिणाम राजकिय क्षेत्रात दिसू लागले. मात्र या कचरा डेपोसाठी पर्यायी जमिन देण्यासंदर्भात शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही कचरा प्रक्रियेसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच कचऱ्याच्या प्रश्नामुळे …

Read More »

चैत्र चाहूल चे २०१८ चे पुरस्कार जाहिर लेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोलेंना ध्यास सन्मान

मुंबई : प्रतिनिधी चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१८ हा पुरस्कार तरुण लेखक दत्ता पाटील आणि ध्यास सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी अविनाश गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या …

Read More »

…आणि पृथ्वीराज चव्हाण संतापले हक्कभंग आणण्याचा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भलतेच संतापले आणि म्हणाले की, पुतळ्याची उंची कमी केल्याचे पत्र दाखवू का ? नाही तर तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन असा …

Read More »

धर्मा पाटील आणि गिरासेच्या नुकसान भरपाईत दलाली करणाऱ्यांची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशीची ऊर्जामंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना जमिन अधिग्रहणाच्या बदल्यात मिळालेली नुकसान भरपाई आणि गिरासेला मिळालेली भरपाई यांच्या फरक आहे. तो कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिले असून त्यानुसार यात दलाली करणाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

टायगरचा अनोखा दोस्ताना गावठी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ… असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार …

Read More »

‘वेगे वेगे धावू…’ला लाभला शंकर महोदवन यांचा स्वर बालपण उघडून दाखविणारे लहान मुलांसाठी खास गाणं

मुंबई : प्रतिनिधी छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिलं तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चाललेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील विश्व, गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतंच शंकर …

Read More »

मंत्री चेंबरमध्ये बसून अंडी उबवतात का? अजित पवार यांचा मंत्र्यांना उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा सुरु असताना विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नाही. याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सभागृहात बसायचे सोडून मंत्री आपल्या चेंबरमध्ये बसून काय अंडी उबवतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. …

Read More »