Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर देशातील समुद्र नसलेल्या राज्यात रिफायनरी प्रकल्प मग विदर्भात का नाही ? भाजप आमदार देशमुख यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी समुद्र जर विदर्भात स्थलांतरीत करता आला असता तर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पही विदर्भात स्थलांतरीत केला असता असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तोच त्यांच्याच पक्षाचे आणि नागपूरचे जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, बिहार व आसाम या राज्यांमध्ये समुद्र किनारे नसताना …

Read More »

अधिकाऱ्यांमधील वादानंतर अखेर डी.के.जैन यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती नागपूर कनेक्शन कामाला आल्याची मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील मुख्य सचिव पदावरील दाव्याच्या वादानंतर अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश जैन यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. जैन हे दुपारी ४.३० वाजता आज सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून स्विकारतील. डि.के.जैन हे भारतीय प्रशासन …

Read More »

आता प्रेक्षकच म्हणणार ‘Once मोअर’ लवकरच रसिकांच्या भेटीला चित्रपट येणार

मुंबई : प्रतिनिधी अनोख्या शीर्षकांच्या सिनेमांसाठी मराठीसृष्टी नेहमीच चर्चेत असते. एखाद्या साध्याशा शब्दाचा शीर्षकस्थानी ठेवून एखादी कथा सादर करण्यात मराठी दिग्दर्शकांचा हातखंडा असल्याचं जगभरातील सिनेरसिकांना ठाऊक आहेत. एका आगामी सिनेमाचं शीर्षकही याला अपवाद नाही. एखादा परफॅार्मन्स किंवा गोष्ट आवडल्यास की मुखातून आपोआप ‘वन्स मोअर’ हे शब्द बाहेर पडतात, पण आता …

Read More »

खासगी बस, ट्रॅव्हल्सवाल्यांनी जास्त पैसे घेतल्यास प्रवाशांनो तक्रार करा परिवहन विभागाचे प्रवाशांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 …

Read More »

६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘संत तुकाराम’च्या प्रयोगात माऊलींचा भव्य सत्कार गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : प्रतिनिधी दादा महाराज मोरे माऊलींच्या ६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने संगीत ‘संत तुकाराम’ या नाटकाच्या मंचावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना माऊलींनी आपले विचार प्रकट केले. या सोहळ्याला गृहमंत्र्यांसोबत किर्तनकार आत्माराम महाराज बडे उपस्थित होते. श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामसुदर सोन्नर महाराज यांच्या प्रयत्नांनी या सत्कार सोहळ्याचं …

Read More »

एक लक्ष झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी स्वत:च्या मालकीचा जमिनीचा हक्क मिळणे ही जीवनात अत्यंत महत्वाची बाब आहे. अनेक वर्षांपासून ज्या जागेवर झोपडपट्टीधारक वास्तव्य करीत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे  देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शहरातील झोपडपट्टीधारकांना एक लक्ष मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. जरीपटका येथील …

Read More »

अखेर खा.सुप्रिया सुळेंच्या इच्छेने प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील अजित पवारांचे महत्व घटले

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य निवडीवरून पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादांवर अखेर खा. सुप्रिया सुळे यांच्या अंतिम इच्छेनुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड करत पडदा पडला. त्यामुळे संघटनांत्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीला …

Read More »

नाणार प्रकल्पविरोधी सभेसाठी राहुल गांधी येण्याची शक्यता प्रकल्पग्रस्तांनी घेतली दिल्लीत राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प विरोधाच्या लढ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सहभागी व्हावे यासाठी नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज शनिवारी नवी दिल्ली येथे जावून त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी …

Read More »

सप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासन सप्टेंबर, २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्मॉल मिडीयम एटंरप्राइजेस ( एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या आरोपामुळे माझा राजकिय भाव वाढला भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षात असताना मला पवार साहेब नेहमी सांगायचे क आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, या शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आता माझ्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्याने माझा राजकिय भाव वाढल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळीही मी बिझनेस …

Read More »