Breaking News

Editor

पदभार घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारला दिले ‘हे’ आश्वासन बेंगळूरू - मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार

बेंगळूरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या …

Read More »

कुटुंबियांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केला मंत्रालयातून कामकाजाला प्रारंभ कुटुंबियांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून आलेल्या उध्दव ठाकरे यांचे मंत्रालयात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यत ठाकरेंच्या स्वागतासाठी हार-तुरे आदी गोष्टींची सजावट करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रालयात आले. परंतु त्यांच्याच …

Read More »

मविआ सरकार जाताच शिंदे सरकारने सहकारी संस्थांसाठीचा ‘हा’ निर्णय बदलला १०० सदस्यांपर्यंत रु.७५००, बिनविरोध निवडणुकीसाठी रु. ३५०० खर्चाची मर्यादा

महाविकास आघाडी सरकारने सहकारी सोसायट्यांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले होते. या निर्णयाच्या विरोधात भाजपाकडूनही सातत्याने आवाज उठविण्यात येत होता. यापार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे सरकारने रद्दबातल ठरवित नवा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात नवा शासन निर्णयही …

Read More »

काय झाडी, काय डोंगार…शहाजी पाटील म्हणाले, शिंदे यांनी गोल कसा केला कळलंच नाही इनसाईड स्टोरी सांगताना केला अनेक गोष्टींचा उलगडा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये शहाजी पाटील हे सर्वात पुढे होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा कार्यकर्त्याबरोबरील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत गाजला. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण …

Read More »

शिवसेना खासदार राऊत म्हणाले, ते काम एकनाथ शिंदे यांच्या आकलनापलीकडचे देवेंद्र फडणवीस यांच्या बुध्दीचार्तुयाचा अभिमान

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आले. मात्र शेवटपर्यत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाईल असे वाटत असतानाच काही तास आधी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदावप एकनाथ …

Read More »

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय, “या” वाहनांना टोलमाफी आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.       आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.  या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व  राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले. वारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी        आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत.  पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन सत्रात २४ तास ड्यूटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्यावी, दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. पाऊस व आरोग्य सुविधा मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सॅनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची सुविधा पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. तसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा खड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा.दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा. संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.    वाहतूक व्यवस्था व वीज पुरवठा           सर्व मानाच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये. वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा      आषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने ४७०० बसेसची व्यवस्था केली आहे, परंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्‍यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसच्या संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. समन्वय अधिकारी नेमणूक  अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले. चंद्रभागेत स्नान व व्यवस्था  चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी. महिला भाविकांसाठी निवारा व्यवस्थेत वाढ करा. वाढीव निधीची मागणी  जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोय- सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगरविकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. Share on: WhatsApp

Read More »

एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या भावना गवळी यांची अखेर शिवसेनेकडून उचलबांगडी संसदेतील प्रतोद पदी खासदार राजन विचारे यांची नियुक्ती

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिल्यानंतर आता खासदार ही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; मी जनतेचा सेवक म्हणून काम करतोय नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करावे

पावसाचा जोर वाढत असून आपल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही देत शासन आणि प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यास शासनाविषयी चांगली लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने लावल्यास चांगले काम होते. मी राज्याचा जनसेवक म्हणून काम करतो आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे असे …

Read More »

उध्दव ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांचा इशारा, १८ पैकी १२ खासदार अनं २२ आमदार… शिवसेना पक्ष आमचा आहे अनं तो पुन्हा उभा करू

शिवसेनेतील बंडखोरीनंतर किमान राहिलेले तरी आपल्या सोबत रहावेत किंवा आहेत की नाहीत या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून झाडून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडत त्यांची मते जाणून घेत आहेत. तसेच आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांना …

Read More »

आगामी तीन दिवस “या” जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार ( ६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात …

Read More »