Breaking News

Editor

उध्दव ठाकरे म्हणाले, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते खरं हिंदूत्व असेल तर काश्मीरींच्या संरक्षणासाठी जा

मी पोहोचल्यानंतर थोडंस हॉटेलमध्ये टिव्ही पहात होतो. त्यावेळी काही चॅनेलवर तोफ धडाडणार वगैरे असे सुरु होतं. मात्र ढेकणांना चिरडायला तोफेची गरज लागत नाही. तसेच त्या तसल्या फालतू गोष्टीसाठी माझ्या शिवसैनिकांची ताकद मी वाया घालविणार नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे आदेश

राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत …

Read More »

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार घरून या संकेतस्थऴावर करता येणार अर्ज

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. स्वच्छ भारत मिशन …

Read More »

काँग्रेसकडून “या” दोघांना विधान परिषदेसाठी उमेदवारी अशोक भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना जाहिर

विधान परिषद निवडणूकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींकडून दोन उमेदवारांच्या नावाला संमती दर्शविली आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अशोक भाई जगताप आणि थोडेसे अडगळीत पडलेले चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही महिन्यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांची स्थानिक स्वराज्य …

Read More »

नाराज विनायक मेटे यांचा भाजपाला इशारा, अद्यापही वेळ गेली नाही विधान परिषद निवडणूकीत एकाही सहयोगी पक्षाला उमेदवारी नाहीच

विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपाने आपले पाच उमेदवार जाहिर केले. या यादीत पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला असला तरी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एकाही सहयोगी पक्षाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये रिपाई-आठवले गट, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांना डावलले गेले आहे. त्यामुळे नाराज …

Read More »

राज्यसभेसाठी मनसे कोणाला करणार मतदान? शेलार यांनी केला खुलासा आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करण्याची शक्यता

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून सहाव्या जागेसाठी आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मनसेचे मत मिळावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतली. …

Read More »

मंत्री असतानाही उमेदवारी का नाही? सुभाष देसाईंनी दिले “हे” उत्तर विधान परिषदेत निवडणूकीतील पत्ता कटवरून देसाईंचा खुलासा

राज्यसभा निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला. या निवडणूकीत शिवसेनेकडून विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट त्यांच्याऐवजी सचिन अहिर यांना तर दिवाकर रावते यांच्या जागेवरून आमश्या पाडवी अशा दोन चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मंत्री सुभाष देसाई यांना निवडणूक का लढवित …

Read More »

राज्यसभा निवडणूकः ईडी म्हणते, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा

राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी तात्पुरता जामिन मिळावा याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच मतदान करण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा अशी मागणीही केली. त्यावरील आज झालेल्या सुनावणी दरम्यान सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने विरोध केला. त्यामुळे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने …

Read More »

पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा …

Read More »

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज मंत्री सुभाष देसाईं घरी बसणार का?

राज्यसभेच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता विधान परिषद निवडणूकीची वावटळ सुरु झाली. या वावटळीत शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव जाहीर झाली नाहीत. मात्र आज शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबार येथील आमश्या पाडवी या दोघांना उमेदवारी जाहिर झाली. तसेच या दोघांनी आज विधानभवनात येवून विधान परिषदेकरीता अर्जही भरला. वाचा …

Read More »