Breaking News

Editor

“या” जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहिर; अर्ज मात्र ऑनलाईन राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाचा आदेश जारी

ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नसल्याचेही तत्कालीन महाविकास आघाडीने जाहिर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य …

Read More »

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून इशारा दिला

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती …

Read More »

गडकरी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था महाराष्ट्राशिवाय पाच ट्रिलीअन डॉलरची होणार नाही मुंबई, महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात …

Read More »

समृध्दीला दिलेले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले? मुख्यमंत्री शिंदेंकडूनच उल्लेख नाही महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ठरेल

तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र आता शिवसेनेत केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र आज …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, जे सन्मानाने झालं असते ते घातापाताने का? भाजपासह बंडखोरांवर साधला निशाणा

तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असून ठाणे महानगरपालिकेचे एक महिला नगरसेविका वगळता सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाल्याचं बोललं जात असल्याचे सांगण्यात येत असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरासह भाजपाला खोचक सवाल करत जे सन्मानाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांना आता स्पेशल प्रोटोकॉल नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश वाहनचालकांचा खोळंबा नको

राज्यात शिवसेनेत केलेल्या अंतर्गत बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर असलेल्या सर्वच आमदारांपैकी काही जणांना केंद्र सरकारकडून एसपीजी, तर काहींना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली. ती सुरक्षा व्यवस्था अद्यापही आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे यांनाही मुंबईत आल्यानंतर एसपीजीची सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र आता मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे बंडखोरांना प्रत्युत्तर, बोलत नसलेले तिथे गेल्याने आता बोलू लागले बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर, संजय राठोड यांच्या वक्तव्यानंतर टीकास्त्र

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती असा …

Read More »

शिंजो आबे यांचे पाच तासानंतर अखेर निधन जाहिर सभेत मारेकऱ्याने गोळ्या झाडल्याने गंभीर जखमी झाले

काही महिन्यापूर्वी दुसऱ्यांदा निवडूण आल्यानंतरही आपल्या आजारपणामुळे जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेले आणि भारताचे मित्र म्हणून ओळखले जाणारे शिंजो आबे यांच्यावर आज भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ८.३० वाजता प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पाच तास मृत्यूबरोबरची सुरु असलेली झुंज भारतीय वेळेनुसार दुपारी १.३३ वाजता संपल्याने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचा निर्णय; मराठवाड्यातील “या” जिल्ह्यांसाठी बोगद्यातून पाणी नेणार पश्चिम वाहिन्या नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा

वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच यासाठी खास बोगद्याच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याबाबत विचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री …

Read More »

एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे

साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह  ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या …

Read More »