Breaking News

Editor

शरद पवार म्हणाले, ‘तो’ विषय अजेंड्यावर नव्हता; श्रीलंकेतील परिस्थितीचा बोध घ्यावा पण तो निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असल्याने मान्य करणे भाग

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत धाराशिव आणि औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो विषय आमच्या तिन्ही पक्षाच्या कॉमन मिनिमन प्रोग्राममध्ये नव्हता. इतकेच नव्हे तर त्या विषयावर आमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतरच तो विषय आम्हाला माहित झाल्याची माहिती …

Read More »

विधिमंडळ सचिवांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीसा: अपवाद फक्त आदित्य ठाकरेंचा दोन्ही गटांपैकी एका गटाचा लागणार निकाल

विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत आणि बहुमत चाचणीवेळी एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या ४० आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटात असलेल्या १३ आमदारांचे प्रतोद भरत गोगावले आणि सुनिल प्रभू यांच्या व्हिपचे पालन केले नसल्याच्या तक्रारी एकमेकांच्या विरोधात केल्या. या दोन्ही तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. …

Read More »

शरद पवार यांचा खोचक टोला, सत्ता नसल्याने जे अस्वस्थ होते त्यांची आता… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला टोला

राज्यातील सत्तातंर नाट्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील काही काळ सत्ता नसल्याने जे कोणी अस्वस्थ होते. आता सत्ता आल्याने त्यांच्यातील अस्वस्थता कमी झाली असेल असा खोचक टोला …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला… दिड तास पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे अनं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा

शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज भेट झाली. पंतप्रधानांनी जवळपास दिड तासांचा …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट

देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …

Read More »

दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष्य मात्र मेळघाटातील बाधितांच्या मदतीकडे केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

अशोक चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल- खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची घोषणा केली. अशा घोषणा करून अशोक चव्हाण हे नांदेडच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

अजित पवार यांचा टोला; युतीच्या काळात मानसन्मान मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदेनी… धास्तीने फक्त दोघांचा शपथविधी

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर पहिल्यांदाच टीका करताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो की, मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. …

Read More »

ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार

भारतीय जनता पक्ष ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींचे भाजपाशी संबंध उघड झाले असून भाजपाच्या ढोंगी …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; कसले खोके, मिठाईचे का? मुंबई तोडण्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले अशी काही चर्चा आमच्यात नाही

महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारीवर आले. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »