Breaking News

Editor

कोरोना : अबब ६७ हजार बाधित…जाणून कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण ५३ हजार ७८३ बरे झाले, तर ४१९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा आज ४ हजार अधिक रूग्णांचे निदान झाले असून आतापर्यंतची सर्वाधिक ६७ हजार १२३ इतकी रूग्ण संख्येवर पोहोचली आहे. मात्र बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या तुलनेत ५३ हजार ७८३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने राज्यातील बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ …

Read More »

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे आता हे इंजेक्शन बाधित रूग्णांसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी किंमतीवर कॅप लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे आता …

Read More »

महाराष्ट्रासाठी रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. वाढत्या …

Read More »

भाजपाचे नवाब मलिकांना आव्हान आरोपाचा पुरावा द्या अन्यथा… भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ट्विटरवरून केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी रेमडेसिवीरच्या कुप्या महाराष्ट्रात विकण्यास केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना आव्हान देत त्या संबधीचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी केली. मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर …

Read More »

निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी; कुपी विकायला केंद्राचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडिसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटर वरून केला. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख …

Read More »

मोदींना, ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस मोदीजी, हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या ! नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी …

Read More »

शिवभोजन थाळी योजनेवर टीका करणाऱ्यांना मंत्री भुजबळांचे उत्तर गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अश्या काळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. अशा परिस्थितीतही टीका करत असून टीका करण्याआधी किमान सत्य परिस्थिती जाणून तरी घ्या असा खोचक सल्ला राज्याचे …

Read More »

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा सर्वाधिक ६३ हजार ७२९ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात रविवारी ६३ हजार २९४ इतके नवे बाधित आढळून आले होते. या संख्येहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर …

Read More »

पंढरपूर- मंगळवेढ्याला जायचाय मग यापैकी एक गोष्ट सोबत ठेवा नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे मतदान १७ एप्रिल २०२१ ला होत आहे. राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. १३ एप्रिल २०२१ …

Read More »

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला पायबंद करण्यासाठी लस निर्मिती आणि संशोधन करण्यासाठी राज्याला परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. परंतु त्यावेळी केंद्रांतील मोदी सरकारने राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर सबंध देशभरात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट …

Read More »