Breaking News

तुर खरेदीप्रश्नी सहकारमंत्री देशमुख यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही

नवी दिल्ली : प्रतिनिधी

शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तुर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतक-यांनी तुर खरेदीबाबत आश्वस्त राहावे असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय कृषि राज्यमंत्री शेखावत यांची भेट घेऊन चर्चा केली व महाराष्ट्रातील तूर खरेदीच्या सद्य स्थितीबाबत चारचा केली. यावेळी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्र्यांशी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असुन तुर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करण्यात येणार नाही असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला  केंद्रीय सचिव पटनायक,नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढढा व इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात यावर्षी १ फेब्रुवारीपासुन हमीभावाने तुर खरेदीला सुरवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर १५ मे पर्यत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र आणखी तूर शिल्लक असल्यामुळे केंद्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता, यावर्षी १५ मे पर्यत १९३ खरेदी केंद्रावर ३३ लाख १५ हजार १३२ किवंटल तुर खरेदी झाली आहे.

शेतकऱ्यांची तुर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असुन केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश काढण्यात येतील. तरी शेतकरी बांधवांनी आपल्याकडील तूर कमी भावाने खाजगी व्यापाऱ्यांना विकू नये असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश

अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *