Breaking News

पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजपसरकार तुंबडया भरतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबडया भरत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप दोन्ही ठिकाणी करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

 पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल आमच्या देशात आणि देशातील सर्वात महाग पेट्रोल आमच्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर लावण्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढले मी समजू शकतो. परंतु महाराष्ट्राचा कर, वॅट आणि केंद्रसरकारचा अबकारी कर यांची एवढी मोठया प्रमाणात कर वाढ झालेली आणि आणि कर वाढ केली आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या पैशातून चालवायचा प्रसंग भाजप सरकारवर आलेला आहे असा आरोपही त्यांनी केला.

 आपले स्वतं:चे कर कमी करण्याची संधी असतानाही राज्य सरकार कर कमी करत नाही. व्हॅल्यूअँडेड टॅक्स कमी केला तर थोडासा दिलासा महाराष्ट्रातील ग्राहकांना मिळेल. केंद्रसरकार पेट्रोलवर जी काही एक्साईज डयूटी घेत असेल तर ती कमी करावी. त्यामुळे देशभर पेट्रोल-डिझेलची परिस्थिती सुधारेल नाहीतर पाकिस्तानचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. अफगाणिस्तानचं, श्रीलंकेचं आणि बांग्लादेशचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. मग भारताने भाजपला मत देवून अशी काय घोडचूक केली असा प्रश्न सामान्य लोकं आज विचारत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली. 

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *