Breaking News

भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मुंबईः प्रतिनिधी
विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली.
राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजप आणि महाविकास आघाडीची थेट पहिली लढत होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र महाविकास आघाडीकडील मतांची संख्या भाजपाच्या सदस्यांपेक्षा जास्त असल्याने निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाचा पुन्हा पराभव दिसायला नको म्हणून राजन तेली यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *