Breaking News

‘बेटर इंडिया निर्मिती‘च्या नावाखाली भाजपकडून निवडणूक निधी संकलनाची जाहीरात

फिचर अँपवरून थेट निवडणूक निधी गोळा करण्यासाठी अशीही शक्कल

मुंबई : प्रतिनिधी

निवडणूकांचे वारे वाहू लागले की, सर्वच राजकिय पक्षांकडून निवडणूक खर्चासाठी विविध उद्योजक, कंपन्या, लॉबी करणारे यांच्याकडून ठराविक रक्कम मागण्यात येते. मात्र देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकिय पक्ष असलेल्या भाजपकडून निवडणूकीचा खर्च भागविण्यासाठी थेट नागरीकांनाच बेटर इंडिया अर्थात चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी निधी देण्याचे आवाहन करण्याची नामी शक्कल लढविली आहे.

देशात सध्या १७ व्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता आहे. राजकारणात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्ष आणि काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतील पक्षांकडून या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराचा भाग म्हणून लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच संविधान बचाव, देश बचावच्या घोषणाही देण्यात येत आहेत.

परंतु, भाजपकडून अशा पध्दतीच्या टीकात्मक गोष्टींना बाजूला सारत थेट देशवासियांना विविध मोबाईल अँपच्या माध्यमातून भावनिक साद घालण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी “Hear is your chance to build a better india with small investment” अर्थात इथे चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी छोट्याशा गुंतवणूकीची तुम्हाला एक नामी संधी सारख्या भावनात्मक वाक्यरचना करत ऑनलाईन पध्दतीने निवडणूक निधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही जाहीरात इतक्या कमी वेळ कोणत्याही अँपवर येत असून त्यावरील बोर्ड स्क्रँच केले की त्यावर निवडणूकीसाठी द्यावयाचा निधीची रक्कम येते. त्याखाली लगेच काँऊट असा संदेश येवून ती रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी पुढील प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले जाते.

या अशा अँपबेसड जाहीरातीच्या माध्यमातून निवडणूक निधीबरोबरच निधी देणारा व्यक्ती मतदार म्हणून त्याला पक्षाशी जोडता येत असल्याचे भाजपमधील एका नेत्याने सांगितले.      

               

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *