Breaking News

तंत्र शिक्षणाची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळणार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडशी सामंजस्य करार

मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्र प्राप्तविद्यार्थ्यांची अंदाजे 9 लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतनकरुन ठेवण्यात येणार आहेत.  यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्यकरार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद म. मोहितकर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसलिमिटेडच्या अंतर्गत कार्यरत सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य तंत्रज्ञान  अधिकारी जॉयदिप दत्ता यांच्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा सामंजस्य करार झाला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या डिजीटल इंडियाच्या धोरणानुसार, ही नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रातील माहितीची सत्यता, सचोटी, गोपनीयता व सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. यासेवेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजीटल अथवा प्रिंटेड कॉपी विनासायास उपलब्ध होईल. तसेच सर्व संबंधित भागधारक व सत्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी मार्फत विद्यार्थ्यांच्या संमतीने ऑनलाईनप्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तात्काळ पडताळून पाहणे शक्य  होणार आहे.

यावेळी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय विकास योगेश कुंदनानी , राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या प्रमुख ॲमी श्रॉफ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे  प्रधानसचिव वि. र. जाधव,  उपसचिव डॉ. चं. डि. कापसे व सहाय्यक सचिव आ. शि. आबक उपस्थित होते.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *