Breaking News

भाजपाचा शिवसेनेला टोला, पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार याची प्रतिक्रिया

सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले. सत्तेतील शिवसेना पक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली? असा सवाल भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला.

मैदानै, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्ती संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? पेंग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं असा उपरोधिक टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होती. ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्यीकरणं होणार ना तुम्ही २५ वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना, मग आता ही कबर उखडून दाखवा तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली हे केले आहे अशी टीका करत अफजल तेरे कातील जिंदा है हम शर्मिनदा है…असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख, आणि तुकडे तुकडे गँगला खूश करण्यासाठी करण्यात आले आहे. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती असा आरोपही त्यांनी यावेळी काँग्रेसवर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर याकूबच्या फाशीची कारवाई झाली. या फाशीच्या शिक्षेला अस्लम शेखने विरोध केला होता हे विसरून चालणार नाही असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल तोच दसरा मेळावा घेईल
एका सामान्य शिवसैनिकाला आता मुख्यमंत्री पद मिळाले त्यामुळे पेंग्विन सेनेची कोल्हेकुही सुरू आहे. जो वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल तोच दसरा मेळावा घेईल असे सांगत शिवाजी पार्कचे मैदान कुणाला द्यावे याबाबत नियम नियमावली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणा निर्णय घेतील. मात्र ज्यांच्याकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने आहे, त्यालाच सभा घेता आली पाहिजे असा टोलाही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *