Breaking News

किरीट सोमय्यांचा सवाल, व्यावसायिक भागीदार चतुर्वेदी कुठे आहे? मुख्यमंत्र्यांनी सांगावे श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरेंच्या कंपनीत मनी लॉड्रींग

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कौटुंबिक मित्र, त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ईडीकडून शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे चतुर्वेदी सध्या आहेत कुठे याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत अन्यथा त्यांना फरार म्हणून घोषित करावे असे आव्हान त्यांनी दिले.

प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ.आंबेडकर जयंती दिनाच्या दिवशी सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नंदकुमार चतुर्वेदी याने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लॉंड्रींगच्या माध्यमातून पैसे आणण्यात आल्याचा गंभीर आरोप करत २३ कोटी रूपये आणि ५ कोटी असे मिळून २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये कंपनीच्या खात्यावर दाखविण्यात आले. हा पैसा आला कसा असा सवाल करत या कंपनीशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संबध काय असा सवाल करत याबद्दलचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करावा अशी मागणी केली.

ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यासोबतचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. मी तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. ते नंदकिशोर चतुर्वेदी यांना शोधत आहेत. त्यामुळे नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करण्यात यावे ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारचे भ्रष्टाचाराचे पैसे मनी लाँड्रिंग करण्यात यांनी मदत केली आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुढच्या काही दिवसांत तपास यंत्रणा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी न्यायालयातून मिळवू शकतील. चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यातील तीन कंपन्यांमधील व्यवहार मी काही दिवसांपूर्वी समोर आणला होता. ठाकरे कुटुंबीयांनी याबद्दल एक शब्द ही उच्चारलेला नाही. तर मग ठाकरे कुटुंबिय नंदकिशोर चतुर्वेदी यांचा मनी लाँड्रिंगसाठी वापर करत होते हे सत्य मानायचे का? असा सवालही त्यांनी केला.

गृहनिर्माण विभागाचा वाझे प्रविण कलमे याच्यावर कारवाई कधी?

गृहनिर्माण विभागाचा वाझे प्रविण कलमे याच्या विरोधात एसआरएनेच सरकारी कागदपत्रे चोरत असल्याचे पकडले आणि त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु त्यानंतर हा कलमे सध्या भारतात आहे का? की परदेशात आहे याची कोणताही माहिती महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले नाही. त्याचबरोबर त्याच्यावर कारवाईही अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रविण कलमे यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *