Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनो तुम्ही अर्ज केलात का? मग या संकेतस्थळावर करा मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कलावंत आणि साहित्यिकांना कोणतेही कार्यक्रम करून आपला उदरनिर्वाह करता आला नाही. यापार्श्वभूमीवर साहित्यिक आणि कलावंताना दिलासा म्हणून छोटीशी आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी या सर्वांनी ३१ मार्च पर्यत अर्ज भरावे असे आवाहन राज्य सरकारकडून ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंताना करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शासनामार्फत राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी मानधन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत समितीने मानधन मंजूर झालेल्या अ-श्रेणीतील कलावंतांना ३ हजार १५० रूपये, ब-श्रेणीतील कलावंतांना २ हजार ७०० रूपये आणि क-श्रेणीतील कलावंतांना २ हजार २५० रूपये असे मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अदा करण्यात येते. ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय ५० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ज्या कलावंत व साहित्यिक यांचे उत्पन्न ४८ हजार रूपयांपेक्षा जास्त नाही. जे कलावंत/ साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.

अर्जाचा नमुना www.mahasanskruti.org या वेबसाईटवर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, महात्मा गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२ या कार्यालयातही उपलब्ध असून अर्ज भरल्यानंतर याच कार्यालयात स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी 022-22842634 / 70 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *