Breaking News

दुबईच्या धर्तीवर मुंबईत शॉपिंग फेस्टीवल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबईतही शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन राज्याच्या पर्यटन विभागाकडून मुंबई शहरात करण्यात आल असून हा फेस्टीवल १२ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा फेस्टीवर मुंबईभरात होणार असून कुलाबा, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दादर भागात होणार आहे. त्याचबरोबर या फेस्टीवलमध्ये जवळपास २०० नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याचबरोबर मुंबईतील फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार असलेली हॉटेल्सही सहभागी होत आहेत. तसेच याच कालावधीत सर्व मुंबईत एकाच दरात हॉटेलातील पदार्थही मिळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेबरोबर चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

या फेस्टीवलची सुरुवात वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या विभागात होणार आहे. या फेस्टीव्हलचे ब्रँण्ड अँबेसिडर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार असून त्यांच्याच हस्ते या फेस्टीव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बीकेसी येथील जिओ गार्डनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार फेस्टीव्हलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या फेस्टीव्हलमध्ये प्रामुख्याने कपडे, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, खाद्य महोत्सवांची रेलचेल राहणार असून या सर्व वस्तू डिस्काउंट रेट मध्ये मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शॉपिंग पंधरवड्यात नाईट मार्केटच्या समावेशाबरोबर बॉलिवूड थीम आणि एंटरटेनमेंटचे मोठे आकर्षण राहणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

 

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *