Breaking News

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी
कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले.
यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *