Breaking News

आमदारांनो तुमच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न पाठवा, पण ऑनलाईन विधानमंडळाकडून अधिवेशनासाठी सदस्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाकडून कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच आगामी पावसाळी अधिवेशन तयारीचा भाग म्हणून विधान परिषदच्या आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आदी गोष्टी विधानमंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची विनंती केली. तसेच ही प्रश्न, लक्षवेधी ११ मे रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यतच पाठविण्यास सांगितले.
महाराष्ट्र विधानपरिषद सन २०२० च्या तिसरे (पावसाळी) अधिवेशनासाठी प्रत्येकी ३१ याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील तारांकित प्रश्न सूचना सोमवार, दिनांक ११ मे, २०२० रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत QIS या संगणक प्रणालीवर Online पध्दतीद्वारे स्वीकारण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील तारांकित स्वीकृत प्रश्नांचे बॅलट बुधवार, दिनांक २७ मे, २०२० रोजी दुपारी १.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, पाचवा मजला, विधान भवन, मुंबई येथे काढण्यात येईल.
तसेच दुसऱ्या टप्प्यातील तारांकित प्रश्न सूचना बुधवार, दिनांक २० मे, २०२० रोजी QIS या संगणक प्रणालीवर Online पध्दतीद्वारे सकाळी ११.०० वाजल्यापासून स्वीकारण्यात येतील.
याबाबतचा चक्रानुक्रम सर्व मा.सदस्यांना ई-मेलद्वारे सोमवार, दिनांक ४ मे, २०२० रोजी वितरीत करण्यात आला असून या सचिवालयाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रश्न सूचना सादर करण्यात याव्यात अशी सूचना विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *