Breaking News

पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती

मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाटण खोऱ्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेकडून पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला.

भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या शिल्पा आपटे यांनी राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज कसा असेल याबाबत माहिती दिली. कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे.

कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे. पुढील पाचही दिवस मराठवाडा विभाग वगळता तीन विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे.

कोकण, गोव्यात आणि विदर्भात पुढील पाचही दिवस पाऊस पडणार आहे. पुढील पाचही दिवस गोवा आणि कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आज रेड अलर्ट दिलेला आहे, असं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात आज आणि उद्या विजांच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१. २२ आणि २३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं शिल्पा आपटे म्हणाल्या.

पुण्यात आज आकाश ढगाळ आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.घाट विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. २१, २२. २३ ला आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार होण्याची शक्यता आहे.२४ आणि २५ जुलैला आकाश पूर्णपणे मोकळं राहण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *